Mukhyamantri Vayoshri Yojana 2026: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वाढत्या वयात ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारी उपकरणे (जसे की चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, व्हीलचेअर, वॉकर, लंबर बेल्ट इत्यादी) खरेदी करण्यासाठी थेट ₹3,000 ची एकरकमी आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात देणे हा आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना संक्षिप्त माहिती
💡 ऑनलाइन फॉर्म भरने के लिए हमारे फ्री टूल्स:
- आयु सीमा जांचें: अपनी सही उम्र और पात्रता जानने के लिए उपयोग करें 👉 सरकारी उम्र कैलकुलेटर (Age Calculator)
- फोटो व सिग्नेचर रिसाइज करें: फॉर्म रिजेक्शन से बचने के लिए सही KB और पिक्सल में सेट करें 👉 सरकारी फोटो और सिग्नेचर रिसाइजर (Photo Resizer)
पात्रता निकष व अटी (Eligibility Criteria)
- अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- अर्जदाराचे वय अर्ज करताना 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2,00,000 पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड आणि आधारशी जोडलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) किंवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारीरिक/मानसिक असमर्थतेचे किंवा उपकरणांच्या गरजेबाबतचे प्रमाणपत्र.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र (वयाच्या पुराव्यासाठी)
- महाराष्ट्र रहिवासी दाखला (Domicile Certificate) किंवा रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी)
- बँक पासबुक झेरॉक्स (बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर
महत्वपूर्ण लिंक्स
📲 सरकारी योजना और भर्ती की ताज़ा अपडेट तुरंत पाएं!
सभी सरकारी योजनाओं की किस्त, लिस्ट और नई नौकरियों के नोटिफिकेशन सबसे पहले अपने व्हाट्सएप पर प्राप्त करें।