पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रराजकियसोलापूर

महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात युवा मोर्चाचे ‘होम टू होम’ प्रचार!

पत्रके वाटून महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे केले आवाहन!

मंगळवेढा (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजपा युवा मोर्चाचे शहरध्यक्ष सुशांत हजारे यांनी आमदार समाधान आवतडे ,भाजपा जिल्हा सचिटणीस शशिकांत नाना चव्हाण तसेच युवा मार्चाचे जिल्ह्याध्यक्ष सुदर्शन यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा शहरातील  शनिवार पेठ प्रभाग क्रमांक सहा मध्ये ‘होम टू होम’ प्रचार केला. घरोघरी जाऊन मोदींनी दहा वर्षात केलेल्या योजनांची माहिती दिली,यावेळी कमळाचे बटण दाबून भाजपा ला मतदान करून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन सुशांत हजारे व अदित्य हिदुस्थानी यांनी केले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष नागेश डोंगरे, मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे, युवा मोर्चा सरचिटणीस अजित लेंडवे, सोमनाथ काशीद, उपाध्यक्ष अभय भालेराव,अविनाश मेटकरी,गणेश बुरकूल,रमेश मोरे आदी उपस्थित होते

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close