मंगळवेढा(प्रतिनिधी)15 वित्त आयोगातून केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी एक लाख रुपये ची मागणी करत पहिला हप्ता 50 हजार मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने तालुक्यातील बोराळे येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी मुळगाव अंकोली ता. मोहोळ हा लाचलुचपत पथकाच्या सापळ्यात सापडला.
या घटनेची हकीकत अशी की यातील तक्रारदारांचे मित्र ठेकेदार असून त्यांनी बोराळे येथे शासकीय योजनेतील पंधरा वित्त आयोगाच्या कामाचे व जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत केलेल्या कामाचे बिलासंदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते सदर कामाच्या बिलाची रक्कम ही ग्रामपंचायतच्या खात्यात जमा केली होती त्यावेळी ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांना बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यामध्ये तडजोड होऊन पहिला हप्ता ₹50 हजार ची मागणी केल्याचे पडताळणी स्पष्ट झाल्याने सदर ग्रामसेवकास लाच लुचपत विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई लास्ट लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पो. हवालदार प्रमोद पकाले,पो.कॉ. उमेश पवार,पो. कॉ. स्वप्निल राण्णके,चालक श्याम सुरवसे च्या पथकाने केले अलीकडच्या काळात केंद्र शासनाचा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर थेट येऊ लागल्यामुळे या निधीतील कामे ग्रामपंचायत माध्यमातून केली जात आहेत ज्या ग्रामपंचायत काम करण्यास सक्षम नाहीत त्या ग्रामपंचायतीने ठेकेदाराच्या माध्यमातून काम करून या कामाची देयके अदा करण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवकाकडून ठेकेदारांना देयकासाठी अडवणूक केली जात असल्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांना शेवटी या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी लाखो रुपयाचा पगार असताना देखील या लाचेचा बळी ठरून शासकीय कार्यालयाची प्रतिमा धुळीस मिळत आहे याकडे स्थानिक कार्यालयाचे कार्यालय प्रमुखाचे देखील या कनिष्ठ कर्मचाऱ्याला पाठबळ असल्यामुळे अशा घटनांचे पेय वाढले आहे. या लाच प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे का याची चर्चा पंचायत समितीच्या आवारात सुरू होते. दरम्यान या ग्रामसेवकावर मंगळवेढा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे