ईतरमहाराष्ट्रराज्यसामाजिक

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 179 कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द-मा.आ.नरेंद्र पवारांच्या प्रयत्नांना यश !

कर्मचारी भरती प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा केला होता आरोप

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती को. ऑ. बँकेच्या भरती प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा आरोप करत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले होते.
त्यावर कारवाई करत मुंबई हायकोर्टाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला दणका दिला आहे. त्या अंतर्गत झालेल्या 179 कर्मचाऱ्यांच्या भरतीला रद्द ठरवले आहे.
कर्मचारी भरती प्रक्रिया ही 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरू झाली होती तर 24 सप्टेंबर 2022 रोजी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, त्यामध्ये हजारो तरुणांची अर्ज केले होते मात्र त्या भरती प्रक्रियेत सुसूत्रता नव्हती, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती.
मुंबई हायकोर्टाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला दणका दिल्यानंतर पुन्हा एकदा नोकर भरती होऊन अन्याय झालेल्या तरुणांना न्याय मिळण्याची आशा दिसत आहे, मुंबई हायकोर्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सहकारमंत्री अतुल सावे साहेब यांचे आभार, तरुणांना न्याय मिळेल अस मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close