मंगळवेढा(प्रतिनिधी )मंगळवेढा पोलीसांनी अवैध दारू भटटीवर केलेल्या कारवाईत दोन वाहनासह 5 लाख 7 हजार 850 रू.चा मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 10.30 वा उचेठाण, ता. मंगळवेढा येथील जगताप वस्तीवर अक्षय बनसोडे याचे शेताचे खालील बाजूस नदीकाठी काही लोक हे अवैधरित्या हातभटटी दारू काढत असल्याची माहिती मिळाली असता घटनास्थळी धाड टाकली.त्यामध्ये हातभटटीसाठी लागणारे उग्र, आंबट घाण वासाचे नवसागर, युरीया, बॅटरीचे सेलचे तुकडे, कुजका गुळमिश्रीत रसायन, नवसागर असा 47 हजार 500 ऐवज व 4 लाख किंमतीची फियाट कंपनीची मोटार कार क्र.एम एच 04 एफ ए 7244, तर 60 हजार किंमतीचे एक हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची विनानंबरची मोटार सायकल आदी 5 लाख 7 हजाराचा मुदेमाल मिळून आला.याप्रकरणी
पंकज विजयकुमार जाधव, रा. कासेगाव, ता. पंढरपुर, रणजित विलास गायकवाड, तानाजी बाळु सलगर, सारंग पोपट भोसले सर्व जण रा.सोनके ता.पंढरपूर हणमंत श्रीकांत जाधव, रा. रविवार पेठ, सोलापर,यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, पोहेकॉ महेश कोळी, पोना विठ्ठल विभुते,पोना कृष्णा जाधव, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ राजू आवटे यांनी केली