मंगळवेढासामाजिक

अनुराधा ढोबळेंच्या स्मृतीदिनी आज विविध कार्यक्रमाचे आयोजन!

मंगळवेढा(प्रतिनिधी) सावली फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा ढोबळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शाहू परिवार,बहुजन परिषद आणि सावली फाउंडेशनच्या यांच्यावतीने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अॕड.कोमल ढोबळे यांनी दिली.

चोखामेळा चौकातून शंभरहून अधिक बाल वारकऱ्यांची दिंडी दुपारी दोन वाजता चोखामेळा चौक ते शिशुविहार या दरम्यान निघणार आहे. यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दांडपट्टा पथक कोल्हापूर यांच्या कसरती व मैदानी खेळाचे सादरीकरण होणार आहे. तर इंडियन आयडॉल मराठीचे प्रतीक सोळशे कलर्स मराठी प्रस्तुत ‘सुर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेतील उपविजेती राधा खुडे यांच्या गायनाचा कार्यक्रम पाच वाजता होणार आहे.

दरम्यान संध्याकाळी सात वाजता युवा कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर व ह.भ.प. केशव पवार आळंदी यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी पन्नासहून अधिक कीर्तनकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विजयकुमार देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यासह तालुक्यातील विविध मठाचे मठाधिपती यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close