पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

मंगळवेढा येथे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते अभिजित आबा पाटील यांच्या वतीने १३ एप्रिल रोजी मंगळवेढा येथे गैबी पीर दर्गाह येते इफ्तार पार्टी कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये हिंदू – मुस्लिम बांधव व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली दिसून आली.

सध्या अभिजीत पाटील यांचे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाठीभेटी व यात्रा उत्साहात सामील होताना दिसत आहेत. कार्यकर्ते व नागरिकांकडून पाटील यांचे जंगी स्वागत देखील करीत आहेत…

यावेळी दर्गाह मध्ये चादर चढवून इफ्तार सुरू करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधवांच्या भेटी घेत रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात प्रत्येकाकडून रोजाचे पालन केले जाते. यात पहाटेच्या वेळी उपवास सुरु करताना सहरी केली जाते तर सोडताना इफ्तार केला जातो. इफ्तारच्या वेळी मंगळवेढ्यातील असंख्य हिंदू-मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीत सहभागी होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close