पंढरपूरमंगळवेढासोलापूर

सरपंच पदासाठी 52 तर सदस्य पदासाठी 238 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल!

मंगळवेढा(प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे गेले दोन दिवस उमेदवाराची गैरसोय झाली.आज तहसील कार्यालयात गर्दी झाली. सदस्य पदासाठी 238 तर सरपंच पदासाठी 52 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे यांनी दिली.
या टप्प्यात जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 27 ग्रामपंचायती मंगळवेढा तालुक्यातील आहेत उमेदवारी अर्ज दाखल करावयाची अंतिम मुदत दोन दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी आज तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. जंगलगी,नंदूर,लोणार या ग्रामपंचायत साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सर्वात जास्त उमेदवार अर्ज मानेवाडी ग्रामपंचायत साठी दाख ल झाले.गावनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले पुढील प्रमाणे कंसात सरपंच पदाचे उमेदवार
शिरसी 8(2) ,आंधळगाव 11(4),
खडकी 5(2), अकोला 7 , खुपसंगी 7(1), जुनोनी 1(1),महमदाबाद हु 27(5),बठाण 15(3),शेलेवाडी 14(2), उचेठाण 4(3),ब्रम्हपुरी 1, निंबोणी 5(4), जालीहाळ 4(3),मुंढेवाडी ,भाळवणी 5(1),
चिक्कलगी 18(2) , हिवरगाव 6(1) ,रड्डे 3(6)लक्ष्मी दहिवडी 12, मानेवाडी 33(5) पडोळकरवाडी 24(3) रेवेवाडी 21(3), देगाव 4 ,डिकसळ (1) ,
बालाजी नगर पोटनिवडणूक 3 अर्ज दाखल झाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close