योगी आदित्यनाथ यांची उद्या सोलापूरात सभा

भव्य मंडपाचे काम अंतिम टप्प्यात : सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर(प्रतिनिधी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा उद्या बुधवारी १ मे रोजी दुपारी १.३० वाजता वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे. सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सभेची वेळ दुपारी १.३० ची असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्याळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापूरात आयोजित करावी, अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती. त्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्वाची धडाडणारी तोफ म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखले जाते. तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील मित्र पक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या सभेसाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मंगळवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राम सातपुते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरिता त्यांची सोलापूरात सभा व्हावी, असा आग्रह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.