मंगळवेढा(प्रतिनिधी) भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यू-३ लवंगी या साखर कारखान्यामध्ये सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत व व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असून येणार्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाची जय्यत तयारी चालू आहे. कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व मेंटनन्स इत्यादीचे सर्व कामे प्रगती पथावर चालू आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे. त्याच बरोबर त्यांना येणार्या गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही दिलेली आहे. येणार्या गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून त्यानुसार ऊस नोंदीचे काम ही जवळपास पूर्ण केले आहे. कारखान्याने पाठीमागील सीझन २०२२-२३ चे एफआरपी पेक्षा जादा दर देऊन सर्व ऊस बिल दिलेले आहे. ज्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाची नोंद कारखान्याकडे देण्याची राहिली असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून ऊस नोंदी द्याव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी असि.इंजिनियर दत्तात्रय भोसले व सौ.पल्लवी या उभयंताचे हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, एचआर मॅनेजर संजय राठोड, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, डे.चीफ केमिस्ट सिद्धेश्वर लवटे, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर राजाराम कोरे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितिन करपे, भीमाशंकर मोहिते, किरण कोळी आदी यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.