क्राइमपंढरपूरमंगळवेढासोलापूर

संत भुमीतील अवैध धंद्याकडे लोकप्रतिनिधी लक्षदेतील का?मंगळवेढा शहरात पुन्हा मटक्याच्या चिठ्या आढळू लागल्या!

मंगळवेढा ही संताची भुमी आहे.या भुमीत अवैध धंदे चालू नयेत यासाठी मंगळवेढा-पंढरपुरचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी सत्तेत नसताना सभाग्रहात अवैध धंदे संर्दभात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.त्यावेळी सभाग्रहात तत्कालीन ग्रहमंत्री यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कामाची प्रशांस करत अवैध धंदे संर्दभात सगळ्यात जास्त कारवाई केले असून अवैध धंदे बंद असल्याचे उत्तर सभाग्रहात दिले होते. पंरतु लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यापासून अवैध धंदे नी हळूहळू डोके वर काढत ते आता नवीन वर्षात खुलेआम मटका चालु असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान च्या काळात राजकारणात मोठे बदल होतं सत्तेचे उलथापालथ झाले.व आपले लोकप्रतिनिधी सत्तेत आले.उपविभागीय पोलिस नुतन कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व विद्यमान आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी लोकप्रतिनिधी यांनी ज्यांनी इमारत उभारणीसाठी योगदान दिले त्यांची प्रशांस करण्यापेक्षा मंगळवेढा पोलिस निरिक्षक यांचीची वाहवाह केली.तेव्हा पासून मंगळवेढा शहरात अवैध धंद्यांने आपले मानगुट वर काढण्याचा प्रयत्न करत नवीन वर्षात पुर्णपणे खुले झाले.आता बिनदास्त पण सर्व अवैध धंदे चालू झाल्याचे चित्र दिसत आहे.या व्यवसाय मध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार मुले मटका घेण्यासाठी धंद्यात उतरले आहेत.बुकि चालक कडुन जास्त कमिशन दिले जाते म्हणून या धंद्या उतरत आहे.परंतु बुकी चालक राहतो बाजूला पण कारवाई दाखवण्यासाठी या मटका घेणाऱ्या कारवाई केली जाते.जर हीच कारवाई बुकी चालकावर केले तर हा व्यवसाय आपोआपच बंद होईल. याकडे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष देतील का? सर्वसामान्यांचे किंवा गोरगरिबाची संसार यामध्ये उध्वस्त होत आहेत शहरातील अवैध धंदे व मटका बंद व्हावे यासाठी लोकप्रतिनिधी लक्षदेतील का?असे तालुक्यातील सुजान नागरिकांना कडुन होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close