मंगळवेढामहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार! ५१ फुटी बजरंगबली मूर्तीचे अनावरण-विजय चौगुले

महामेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असणार प्रमुख पाहुणे!

 

सोलापूर(प्रतिनिधी) सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मड्डी वस्ती परिसरात मी वडार महाराष्ट्राचा संघटना व तमाम वडार समाजाच्या वतीने समाजाचे श्रद्धास्थान बजरंगबलीची ५१ फुटी मूर्ती साकारण्यात आली असून लवकरच अनावरण होणार आहे. यानिमित्ताने समाज बांधवांना संघटित करण्यासाठी एक प्रयत्न करण्यात येत असल्याचे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना विजय चौगूले म्हणाले,प्रत्येक समाजाचे श्रद्धास्थान आहेत.वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंगबली असल्याने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोलापूर येथे महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल ५१ फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती साकारण्यात येत असून यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीसह विविध शुभ मुहूर्तावर धार्मिक कार्यक्रम, संघटनाचे मेळावे या निमित्ताने घेऊन वडार समाजाला संघटित करण्याबरोबरच त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे असल्याचे सांगितले. लवकरच बजरंग बल्ली मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मी वडार महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, माजी नगरसेवक विनायक विटकर, खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, लातूरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण, विष्णू मुधोळकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष लक्ष्मण चौगुले, अरुण चौगुले, राजू चौगुले, शंकर चौगुले, बालाजी निंबाळकर, दीपक जाधव, राजू निंबाळकर, दिलीप भांडेकर, निवास निंबाळकर, लक्ष्मण विटकर, लंबू बंदपट्टे, विष्णू चौगुले, रवी शिंदे, अरविंद शिंदे,अनिल चौगुले, दत्ता विटकर, दशरथ पाथरूट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close