मंगळवेढा(प्रतिनिधी) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनाधार विरोधात चालल्यामुळे दोन उपमुख्यमंत्री शाखाप्रमुखासारखे वागत असून मतासाठी उठ सुट कार्यकर्त्यांना नेत्यांना धमक्या देण्याचे काम सुरू केल्याच्या आरोप आमदार शिंदे यांनी केला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जेष्ठ नेते बबनराव अवताडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाने काॅग्रेस उमेदवार आ.प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुशील अवताडे, शैलेश अवताडे,दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार,पाठखळचे सरपंच रुतुराज बिले,अॕड.बिरुदेव घोगरे,मारुती वाकडे,बलभिम शिंदे,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाल्या, की सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातील असताना महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी घालून गुजरातचा कांदा परदेशात विकण्यासाठी खुला केला आहे. दुधाचा दर कमी केला शेतकऱ्याला दिले जाणारे अनुदान अजून दिले नाही. सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम केल्यामुळे ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली.मी मात्र नाममात्र उमेदवार आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराकडे बघू नका माझ्याकडे बघून मतदान करा अशी म्हणण्याची वेळ आली. कर्नाटकातील भाजप उमेदवार अडीच हजार महिलांवर अत्याचार केला आणि पंतप्रधान म्हणतात त्याच्याकडे बघून मला मतदान करा अश्यांची जागा दाखवण्याची वेळ या निवडणुकीतून आली आहे या निवडणुकीत ते 400 पार होणार नसून दीडशेच्या आतच गार होणार आहेत. एकट्या महिलेच्या विरोधात राज्यातील नेत्याबरोबर आता उत्तर भारतातील नेते प्रचारात आणून शहरात जातीय द्वेष पेरण्याचे काम करून युपी, बिहार बनवण्याचा काम सध्या भाजपवाल्या कडून सुरू आहे. सिद्धेश्वर अवताडे म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे त्यामध्ये दुष्काळ सवलत, पिक विमा, दूध दर व अनुदान,शेतीमालाचा हमीभाव, शेतीचे पाणी यासह दहा वर्षापासून रखडलेल्या रेल्वे मार्ग अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण व प्रश्न मांडू शकणारा खासदार संसदेत हवा आहे म्हणून आम्ही आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला प्रास्ताविक प्रा. समाधान शिरसागर यांनी केले या कार्यक्रमास अवताडे समर्थकांनी मोठी गर्दी केली.