Categories: सामाजिक

शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याची गरज असताना लोकप्रतिनिधी राजकीय उखाळ्या पाकाळ्या काढण्यात व्यस्त असतात-अॅड कोमल साळुंखे

मंगळवेढा(प्रतिनिधी) सुडाच्या राजकारणामध्ये रमलेल्यांना राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या वेदना समजून घेण्यात व अश्रु पुसण्यात वेळच नसल्याचे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे यांनी व्यक्त केले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.    यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,पोलीस निरीक्षक रणजित माने,माजी सरपंच लक्ष्मण आकळे मुख्याध्यापक कांतीलाल इरकर,बापूसाहेब मेटकरी,संजय मस्के,कविराज दत्तू, सुभाष मस्के ,संगमेश्वर मस्के, विलास पाराध्ये, वाल्मिकी लोखंडे, तुकाराम मस्के,विकास अवघडे,प्रवीण साठे ब्रह्मदेव वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अॅड साळुंखे म्हणाल्या की,हजारो रूपये खर्चून उत्तर महाराष्ट्र,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात घेतलेली पिके,फळ बागा या गारपीट व अवकाळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याच्या अश्रुचा बांध फुटला, तेव्हा खरी गरज असते ती आधाराची आणि शासकीय मदतीची, शासकीय मदत देवून त्याचे अश्रु पुसण्याची गरज असताना राजकीय उखाळ्या पाकाळ्या काढण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहे.आदीच्या नुकसान भरपाईची मदत सरकारी नियम व फायली प्रवासात कागदावर अडकून पडली आहे.यातून शेतकऱ्यालाच कुणी वाली नसल्याचे सिध्द होत आहे.निसर्गाकडून होणारा अन्याय, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी पिचला,मात्र क्रिकेटच्या लिलावात करोडोची बोली लावली जाते म्हणून शेतकऱ्यालाच क्रिकेटर केले.निदान त्या लिलावात चार पैसे अधिकचे मिळतील,अशी परिस्थिती निर्माण झाली.सध्या
जग बदलत तो बदल आजच्या तरूणांनी समजून घेतला पाहिजे.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले कि, पुस्तक उशाला ठेवून स्पर्धा परीक्षा यशस्वी होता येत नाही त्या प्रमाणे बॅट उशाला ठेवून चांगले क्रिकेटर ही होता येत नाही,त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात,तरच यशस्वी होता येते. सैराट बघायला हरकत नाही मात्र आपले गुण कमी होणार नाही यांची काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने बापूसाहेब मेटकरी व कविराज दत्तू यांची भाषणे झाली क्रिकेट स्पर्धेत फायटर क्लब नंदेश्वर, डीसीसी डोंगरगाव आणि मारापुर या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Share
Published by
मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.