पंढरपूरमंगळवेढा

मंगळवेढा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान!

मारापुर,डोंगरगाव,तळसंगी, गोणेवाडी,येड्राव ही गावे संवेदनशील!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पाच संवेदनशील गावात पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी रूट मार्च करण्यात आल्याचे सांगून मतदाना दरम्यान देखील या गावात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. 18 ग्रामपंचायतीमधील रहाटेवाडी ही दोन गावे यापूर्वीच बिनविरोध झाली.तर गुंजेगाव,मारापुर, ढवळस, डोंगरगाव, पाटकळ, गोणेवाडी, हाजापूर खोमनाळ, तळसंगी, भालेवाडी, सोड्डी, मारोळी,येड्राव,पौट,शिरनांदगी,बावची या 16 गावात मतदान घेण्यासाठी 50 केंद्रासाठी 4 झोनल कर्मचारी, 11 निवडणूक निर्णय अधिकारी,250 कर्मचाऱ्यांसह 75 राखीव कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्य व कर्मचारी आज दुपारी या मतदान केंद्रावर पाठवण्यात आले.

याशिवाय पोलीस खात्याकडून 125 पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी,होमगार्ड सह कडोकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.तर मारापुर,डोंगरगाव, तळसंगी, गोणेवाडी, येड्राव ही गावे संवेदनशील असल्यामुळे या गावावर पोलिसांचे अधिक लक्ष आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह संवेदनशील गावात रूट मार्च केले आहे उद्या मतदान असल्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात थेट सरपंचासाठी व सदस्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या उमेदवारासाठी आजची रात्र ही खत्तलची रात्र ठरणार आहे. मतदारांचा कौल आपणालाच मिळावा यासाठी उमेदवारांनी जेवणावळीसह वेगवेगळ्या आयुधाचा वापर केला आहे. परगावी असलेल्या मतदारांना देखील या निवडणुकीत मतदान करण्यासाठी गावाकडे पाचारण करण्यात आले. या मतदानाची मतमोजणी मंगळवारी शासकीय गोदाम मंगळवेढा येथे होणार असून निकालानंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close