‘वरिष्ठा पर्यंत चिरीमिरी पोहोचवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांचा बळी!

त्या' ग्रामविकास अधिकाऱ्याच्या लाच प्रकरणी वरिष्ठांची चौकशी होणार का? पंचायत समिती आवारात चर्चेला उधाण...

मंगळवेढा(प्रतिनिधी) 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होत असून तो निधी ग्रामसेवक व सरपंचाला खर्च करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मंजूर कामांची बिले ही ग्रामपंचतय मार्फतच अदा होत असतात मात्र खात्यावरून पैसे काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे त्यांची परवानगी घेण्यासाठी पंचायत समितीच्या कारभारात ग्रामसेवकामार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होत असल्याच्या चर्चा असून लाचलुचपत ने पकडलेल्या त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या प्रकरणात वरिष्ठांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा पंचायत समितीच्या आवरात होवू लागली आहे.
मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच मागणाऱ्या गोपीचंद दादा गवळी या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून ताब्यात घेतले आहे या कारवाईनंतर पंचायत समितीमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते 15 व्या वित्त आयोगात केंद्र शासनाचा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर थेट येऊ लागल्यामुळे ग्रामपंचायती सक्षम झाल्या आहेत 15 लाखापर्यंत ग्रामपंचायत कामे करते तर बाकीच्या कामाचे ऑनलाइन टेंडर करून कामे केली जातात पण ही बिले काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन मगच सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त डीएसस्सी मार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे बिले सोडली जातात. पैशाच्या परवानगीसाठी साहेबाना टक्केवारी द्यावी लागते म्हणून काही ग्रामसेवकाकडून ठेकेदारांची अडवणूक करून पैसे मागितले जातात नियमानुसार कामं करून पुन्हा टक्केवारीही द्यावी लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांना शेवटी या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणी सापडलेला ग्रामविकास अधिकारी हा केवळ बळीचा बकरा असून सर्रास असे प्रकार सुरू असून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ पध्दतीने काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे समजते, सध्या पंचायत समितीचा कार्यकाल संपल्यामुळे प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहत असून त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा कोणताही वचक नाही.अनेक प्रकारच्या वर्गणी देऊन ग्रामसेवक मेटाकुटीला आल्याच्या चर्चा होत आहेत सध्या पंचायत समिती भ्रष्टाचाराचे कुरण होऊ लागल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे त्यामुळे काल बक्षिसाच्या स्वरूपात लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याने नेमकं बक्षीस स्वतःसाठी मागितलं की वरच्या साहेबांसाठी? याची चौकशी होणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.