मंगळवेढा

इंग्लीश स्कुल व ज्युनीअर कॉलेज, मंगळवेढा येथे विविध कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वार्षीक दिनदर्शिकेप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश साेा तथा मा. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर श्री. एम. एस. आझमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर श्री.यु.पी.देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका विधी सेवा समिती, मंगळवेढा तसेच विधीज्ञ संघ, मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लीश स्कुल व ज्युनीअर कॉलेज, मंगळवेढा येथे दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी  न्यायाधीश क.स्तर, मंगळवेढा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  श्रीमती. व्ही. के. पाटील, सह. दिवाणी न्यायाधीश क.स्तर, मंगळवेढा यांनी सायबर गुन्हा (Cyber Crime) याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.                                               विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. श्री.उल्हास माने यांनी कॉपी ॲक्ट, व मोटर वाहन अधिनियम (M.V.Act) या विषयांवर  मार्गदर्शन केले त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराचे महत्व विद्यार्थ्यांना प्रास्ताविकामध्ये सांगितले.                                    ॲड. श्रीमती. एस. आर. क्षीरसागर यांनी लैंगीक गुन्हयांपासुन बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) बाबत मार्गदर्शन केले,  ॲड. श्रीमती. आर. जी. माने-चाैधरी यांनी बाल न्याय कायदा (Juvenile Justice Act) बाबत  मार्गदर्शन केले,  ॲड. श्रीमती.ए. ए. भिंगे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयी मार्गदर्शन केले, ॲड. श्रीमती. टि.सी. मुजावर यांनी शिक्षणाचा अधिकार (Right To Education) या विषयी  मार्गदर्शन केले.  तसेच इंग्‍िलश स्कुल व ज्युनीअर कॉलेज मंगळवेढाच्या संचालीका श्रीमती. मीनाताई कदम यांनी त्यांचे मनोगत व्यक्‍त केले.                                                         सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, ॲड.पी. जी. घुले, ॲड.एस. आर. पवार, ॲड. एफ. आर. मुल्ला, ॲड.डी. एस. माने, ॲड.अश्वीनीत चेळेकर, ॲड.ओ. आर. भुसे, ॲड.सौरभ मोरे, ॲड.एस. ए. सावंत, ॲड. श्रीमती. हसीना सुतार व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.  तसेच इंग्लीश स्कुल व ज्युनीअर कॉलेजच्या संचालीका श्रीमती. मीनाताई कदम, प्राचार्य रविंद्र काशिद उपप्राचार्या. श्रीमती तेजस्वीनी कदम,सचिन इंगळे, दिपक शिणगारे  रेवणसिध्द लिगाडे व इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. एस. बी. ताड यांनी केले व श्रीमती. एस. ए. जगताप यांनी आभार मानले.  सदर कार्यक्रमा करीता भरपुर संख्येेने विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी उपस्थित राहुन कायदेविषयक शिबीराचा लाभ घेतला.  सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close