चालू गळीत हंगाम उस उत्पादकच्या विश्वासावर युटोपियन यशस्वीपणे पार पाडेल–उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

मंगळवेढा (प्रतिनिधी) कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२३-२०२४ या दहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.१७ /१०/२०२३  रोजी आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते बॉयलरपूजन व अग्निप्रदीपन करण्यात आले. अत्यंत साधेपणाने व संपूर्णत: कौटुंबीक उत्साही वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी कारखान्याचे संगणक विभाग प्रमुख अभिजीत यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री  यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, गळीत हंगाम२०२३-२०२४ हा आपल्या कारखान्याचा दशकपूर्ती गळीत हंगाम आहे. मागील ९ वर्षात केवळ ऊस उत्पादक व कर्मचारी बांधव यांच्या विश्वासावर आपल्या कारखान्याने नावलौकिक मिळवलेला आहे. ही विश्वासाहर्ता कायम ठेवण्यासाठी युटोपियन हा कायम बांधील राहील असा विश्वास ही परिचारक यांनी व्यक्त केला.

सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही कारखाना चालू गळीग हंगाम २०२३-२०२४ व पुढील ही गळीत हंगाम२०२४-२०२५ हा सुद्धा केवळ ऊस उत्पादक यांच्या विश्वासावर, व ऊस उत्पादक यांना  वेळेत व चांगला दर देत असल्यामुळे यशस्वी पार पडेल असा आशावाद व्यक्त करीत पुढील काळात ही खाजगी कारखान्याच्या तुलनेत ऊस दराबाबतीत युटोपियन कदापी मागे राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने १ कोटी ४४ लाख लिटर चे इथेनोल उत्पादन केले आहे साधारण पणे तितकेच उत्पादन याही वर्षी अपेक्षित आहे गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता आपली सर्व यंत्रणा सज्ज  आहे. सर्व कामगार वर्गांनी आपले कौशल्य पणाला लावून कार्यरत राहावे व गळीत हंगाम यशस्वी करावा  व शक्य तितके काटकसरीचे धोरण अवलंबावे त्यातच आपणा सर्वांचे हित असल्याचे ही त्यांनी सांगितले सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे सह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख ,अधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.यावेळी स्वागत , प्रास्ताविक  व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.