युटोपियन शुगर्स चालु गळीत हंगाम करीता रु.२७११ प्रमाणे पहिला हप्ता देणार :- उमेश परिचारक

मंगळवेढा (प्रतींनिधी)युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप करणाऱ्या ऊसास प्रती मे.टन रु.२७११/- प्रमाणे सुधारीत दर देणार असल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

 युटोपियन शुगर्स या कारखान्याने यापूर्वीच हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप होणाऱ्या ऊसास प्रती मे.टन रु.२५११/- प्रमाणे पहिली उचल जाहीर केलेली होती . त्यामध्ये आता रक्कम २०० रु ची वाढ करून रु.२७११/- प्रमाणे सुधारीत दर देण्यात येणार असून लवकरच पहिल्या पंधरवडयाच्या बिलाची रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे ही परिचारक यांनी सांगितले.

सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी या सुधारीत दर बदलाची नोंद घेऊन गाळप हंगाम २०२३-२०२४ करीता जास्तीत जास्त ऊस युटोपियन शुगर्स कडे गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही परिचारक यांनी केले.

सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते प्रमुख ,अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.