युटोपियन शुगर्स लि. कडून गळीत हंगाम २०२२-२३ चा पहिला हप्ता २४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग -उमेश परिचारक

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम!

मंगळवेढा (प्रतिनिधी) कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या  कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे.                                                                                सदरच्या ऊस बिलाची रक्कम ही ऊस उत्पादक यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आली  असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. याविषयी बोलताना परिचारक म्हणाले की गळीत हंगाम २२-२३ मध्ये उसाची उपलब्धता चांगली आहे.                                                                   युटोपियन शुगर्स कडे पहिल्या पंधरवड्याचे अखेर गाळप झालेल्या ऊसाचे बिल आम्ही देत असून कारखान्याने या पूर्वीच जाहीर केल्या नुसार ऊसाच्या ८६०३२ या जातीस १०० रु. जास्तीचा दर  देण्याच्या उद्देशाने प्रती मे.टन २४०० रु. प्रमाणे तर को- २६५ या जातीच्या ऊसास प्रती मे.टन २३०० रु प्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता देत असल्याची माहिती ही परिचारक यांनी दिली.

युटोपीयन शुगर्स सध्या प्रती दिन ५२०० मे.टन या गाळप क्षमतेने चालू असून कारखान्यास चालू गळीत हंगामात विक्रमी गाळप होण्याची अपेक्षा आहे. त्या नुसार कारखान्याची सर्व यंत्रणा कार्यरत आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.