सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची (बीए, बी. कॉम, बीएससी) परीक्षा सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू होईल.विद्यापीठाने तसे तात्पुरते वेळापत्रक तयार केले असून काही दिवसांत ते अंतिम केले जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालये असून त्याअंतर्गत अंदाजे ६८ ते ७० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रिन पद्धतीने होणार आहेत. मार्चमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनमधून नोकरीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे परीक्षा वेळेत घेऊन निकालही वेळेत प्रसिद्ध व्हावेत, यादृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. निकाल आणखी कमी दिवसांत जाहीर व्हावेत, यासाठी विद्यापीठाकडून वारंवार सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.
कॅरीऑन’मधून ‘त्या’ विद्यार्थ्यांना एकमेव संधी
प्रथम व द्वितीय या दोन्ही वर्षांत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा दोन्हीपैकी एका वर्गातील सर्व विषय निघाले, पण एका वर्गातील काही विषय राहिले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता ‘कॅरीऑन’च्या माध्यमातू्न थेट तृतीय किंवा अंतिम वर्षासाठी प्रवेश घेण्याची संधी विद्यापीठाने दिली आहे. आता नोव्हेंबरपासून सुरू होणारी सत्र परीक्षा त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून विद्यापीठाने त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. परंतु, या सत्र परीक्षेत पहिल्या दोन वर्षांतील अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यास पुन्हा पूर्वीच्याच वर्गात बसावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा अन् निकाल वेळेतच
कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ६ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे परीक्षा झाल्यापासून ३० दिवसांत निकाल प्रसिद्ध करण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाकडून घेतली जात आहे.
– डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.