पुणे(प्रतिनिधी) केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालया, भारत सरकार अंतार्गत येणाऱ्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील शेती व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल कृषिभूषण अंकुश पडवळे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार केंद्रीय कृषीमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज पुणे येथिल विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
पुणे येथिल वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत (VAMNICOM) केंद्रीय कृषी मत्रालयाच्या वतीने आज कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकरी, संस्थांचा सन्मान व राष्ट्रीय कृषी मुल्य वर्धन साखळी वाढविणे, विस्तार व संधी याबाबत च्या कार्यशाळेत श्री पडवळे यांना वरील पुरस्कार प्रदान करण्यात आला यवेळी राज्याचे कृषीमंत्री ना. अव्दुल सत्तार, राज्याचे फलोत्पादन मंत्री ना. संदिपान भुमरे, केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा, केंद्रीय अतिरिक्त कृषी सचिव डॉ. अभिलेक्ष लेखा, राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय कृषी उपसाचिव प्रियरंजन राज, राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार उपस्थित होते. श्री पडवळे यांनी गट शेती, सेंद्रिय शेती,करार शेतीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे आदर्शवत काम केले आहे. दुष्काळी भागात अत्यंत कमी पाण्यावर शेततळ्यांच्या माध्यमातून त्यांनी आदर्शवत काम केले आहे. तसेच गटशेतीच्या माध्यमातून शेडनेट शेतीचे मोठे काम केले. श्री पडवळे यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानेही कृषिभूषण पुरस्काराने यापूर्वीच त्यांना सन्मानित केले आहे. तसेच स्वयंसेवी संस्था व निमशासकीय संस्थानीही त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना 25 पेक्षा जास्त पुरस्कार दिलेले आहेत. यावेळी कार्यक्रमास सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, अखिलभारतीय द्राक्ष संघाचे अध्यक्ष सोपान कांचन , सिताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, अखिल भारतीय भाजीपाल श्रीराम गाडवे, डांळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, ग्रीन होराईजन फार्म चे अमरजित जगताप, सुभाष नरोडे, CS योगेश कोईमकर आदी उपस्थित होते.