पंढरपूरमंगळवेढा

आ.समाधान आवताडे गटाचे रहाटेवाडी ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व!

धसाडे यांच्या रुपाने पहिल्यांदाच लिंगायत समाजाचा सन्मान!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत रहाटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. पंढरपूर – मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीवर आमदार आवताडे यांचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले आहे. समाजकारण व राजकारण या कार्यक्षेत्रात जनतेची सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा राजकीय द्वेष न ठेवता सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचा मौलिक सल्ला आ. आवताडे यांनी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना दिला.

सदर निवडीमध्ये दत्तात्रय धसाडे यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमध्ये आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून धसाडे यांना सरपंच पदावर संधी देऊन लिंगायत समाजाचा सन्मान करून सर्वसमावेशक राजकारणाचा नारा मजबूत केला आहे. त्याचबरोबर नूतन ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रदीप पवार, सौ निर्मला पाटील, सौ शकुंतला पवार, सौ आश्विनी पाटील, नवनाथ पवार, महावीर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर आ. समाधान आवताडे यांनी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व नूतन पदाधिकारी यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे फेटा बांधून अभिनंदनपर सत्कार व पुढील कार्यवाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या राजकीय व सामाजिक कार्य आरंभा पासून नेहमीच माझ्या नेतृत्वाला साथ आणि पाठींबा देणाऱ्या आपल्या रहाटेवाडी गावच्या मूलभूत आणि पायाभूत विकासात्मक वाटचालीसाठी मी नेहमीच आपल्या सोबत आणि साथीने राहीन असा विश्वासही आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थांना दिला.

या निवडीप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक प्रा. येताळा भगत, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक राजन पाटील, माजी उपसरपंच शाम पवार, माजी मिस्टर सरपंच गोपाळ पवार, दिलीप पवार, अरुण पवार, संभाजी पवार, जगदीश पाटील, पंडीत पवार, बाळकृष्ण पवार, धनंजय पवार, उदयसिंह पवार, शरद पवार, गोवर्धन पवार, सतिश पाटील, संतोष पवार, विकास पवार, नामदेव पवार, तुकाराम पवार, संजय जाधव, अनिल पवार, पोपट पवार, वैभव पाटील, अतुल पाटील, जीवन पवार, समाधान पवार आदी मंडळींनी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close