मंगळवेढाशैक्षणिकसोलापूर

शालेय जिल्हास्तरीय बॉल बॕडमिंटन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कुलचे निर्विवाद वर्चस्व!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा येथील जवाहरलाल प्रशालेच्या १४ वर्षे मुले व १४ वर्षे मुली या दोन्ही संघांनी सलग तिस-या वर्षी जिल्हा विजेतेपद पटकावले. सलग तीन वर्षे जिल्हा संघाचे नेतृत्व कर्णधार प्रसाद मोरे याने केले. मंगळवेढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत नेत्रदीपक कामगिरी केली. यामध्ये १४ वर्षे मुले, १४ वर्षे मुली व १७ वर्षे मुले या तीन गटातील संघाने जिल्ह्यात अव्वल येण्याचा मान मिळवला. सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये जवाहरलाल हायस्कूलच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे मुलांच्या संघात कर्णधार असीन शेख याच्या नेतृत्त्वाखाली ओम ढोबळे, अथर्व ढगे, सुमित दुधाळ, सोहम भगरे, प्रेम चकोर, हुमायू कांबळे, सुमित माळी, सिद्धेश्वर मेटकरी, आदित्य अवघडे यांनी उत्कृष्ट खेळ केला.

१४ वर्षे मुलींच्या संघाचे कर्णधार नंदिनी चव्हाण हिने नेतृत्व केले. संघात कादंबरी माने, तनुष्का जाधव, सई यादव, अनुष्का मोरे, सायली माळी, मोहिनी घाडगे, पूर्वा बडोदकर, गौरी भोसले, वैष्णवी जाधव या खेळाडूंचा सहभाग होता. तर १७ वर्षे मुलाच्या संघाचे नेतृत्व कर्णधार प्रसाद मोरे यांने करत शुभम जावळे, सार्थक जाधव, सार्थक शिंदे, प्रदीप माने, ऋषिकेश चव्हाण, विश्वजीत यादव, अजिंक्य मोरे, कार्तिक घाडगे, शंभू खुळे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना प्रशालेतील शिवकुमार स्वामी, नितीन मोरे, क्रीडा शिक्षक शहाजी ढोबळे, संतोष दुधाळ यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर आवताडे यांनी तसेच मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. राहुल शहा आणि सर्व सन्माननीय संचालक यांनी सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत १४ व १७ वर्षे मुले व १४ वर्षे मुलींच्या संघांने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढाच्या संघातील सर्व खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close