मंगळवेढा(प्रतिनिधि) यंदाच्या गळीत हंगामात दामाजी कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.
यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याच्या वतीने बसविण्यात आलेल्या रोलरची पूजन अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे,निर्मला काकडे,लता कोळेकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, सभासद-शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याच्या ऑफ सिझनमधील कामे पूर्णत्वास येत आहेत.यावर्षी पाऊस चांगला झालेने ऊसाची वाढ चांगली झाली आहे.येणा-या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे येणारा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालणार आहे.मागील हंगामातील ऊस बिले, वाहतूक बिले,कर्मचारी पगार वेळेत देण्याचे काम या संचालक मंडळाने केले येणा-या गळीत हंगामामध्ये 5 लाख मे.टनाचे गाळपाचे उदिष्ट संचालक मंडळाने ठेवले असून उपाध्यक्ष तानाजी खरात व संचालक मंडळातील सहकारी यांचे सहकार्याने शासनाने दिलेल्या परवानगीचे तारखेपासुन कारखाना सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सर्वांच्या सहकार्याने येणारा गळीत हंगाम निश्चीतच यशस्वी होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.