Uncategorizedमंगळवेढामहाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या दोन सोन्याच्या खाणी!

महाराष्ट्रात दोन ठिकाणी सोन्याची खाणी सापडल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लॉक आढळून आहेत.अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या भूर्गभात कोळसा, बॉक्साईट, लोखंडाच्या खाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती समोर आली आहे. या खाणी वन्यजीव क्षेत्रात असल्याने येथून सोने काढले जाणार का याबाबत प्रश्न उपस्थित केले जातं आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, नव्याने सापडलेल्या या खाणी राज्याच्या फायद्याच्या आहेत. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाच्या अहवालानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ‘मिंझरी आणि बामणी’ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भूर्गभात सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. आता पुढील दृष्टीने आणखी चाचणी सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनानुसार, चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूर्गभात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रुथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याची माहिती आली होती. आता सोने खाणीचे ब्लाॅक सापडल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close