मंगळवेढा(प्रतिनिधी) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या पारंपारिक बारा बलुतेदार कारागिरांना कसल्याही प्रकारचा न्याय दिला गेला नाही अशा सर्व पारंपरिक 12 बलुतेदार पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली असून सोलापूर जिल्ह्यातील अठरा पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी ऑनलाईन पद्धतीने सुक्ष्म व लघु व मध्यम उद्योग विभागाचे संकेतस्थळ, सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पारंपरिक कारागिरांची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँकेचे पासबुक, व आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबर या कागदपत्रांची आवश्यकता आहे. . या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना ५ टक्के व्याजदरात विना तारण ३ लाखापर्यंत दोन टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
लाभ घेणाऱ्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व १५ दिवसीय कौशल्य पुर्ण प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीत रूपये प्रति दिन ५०० रूपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या कारागीरांना टूलकिट खरेदीसाठी १५ हजार रूपयांचे व्हावचर्स देखील देण्यात येणार आहे. सुतार, लोहार, सोनार (दागिने कारागीर), कुंभार, न्हावी, माळी (फुल कारागीर), धोबी, मुर्तीकार, टोपल्या, झाडु, बांबुच्या वस्तु बनवणारे, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनविणारे, कुलूप बनविणारे व विनकर कामगार इत्यादी पारंपरिक कारागीर या योजनेत समाविष्ट केले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे ,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते,सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी ,आ समाधान आवताडे ,याचा मार्गदर्शनाखाली व शुभेहस्ते .भाजपा सोलापूर संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव , लोकसभा संयोजक अँड. सुहास माळवे, विवेक खिलारे जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा सोलापूर ग्रामीण ,समाजसेवक फाऊडेशन लक्ष्मीचे तुळशीदास करांडे, उमेश अरुणशेठ माळवे,संजय मुरलीधर शहाणे,वासुदेव इंदापूरकर,हरिभाऊ इंदापूरकर, शंकर आंबले,प्राजक्ता बेणारे महिला आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष,अपर्णा तारके ,बादलसिंग ठाकूर,दत्तात्रय शिंदे पिराजी धोत्रे हे उपस्थित होते.