मंगळवेढा(प्रतिनिधी) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे योजनेअंतर्गत नाबार्डकडून मंगळवेढा येथील बावची गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर फुल उभारणीसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली गाव भेट दौरा सुरू असताना बावची येथील ग्रामस्थांनी ओढ्यावरील पूल अत्यंत गरजेचा आहे तात्काळ तो पूल मंजूर करा अशी मागणी केली होती पत्राद्वारे संबंधित विभागाला या रस्त्यावर पूल उभारणे गरजेचे आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी शासनस्तरावर केली होती त्यानुसार नाबार्ड कडून नुकतीच राज्यातील कामांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये या पुलालाही मंजुरी मिळाली असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ-भाळवणी-निंबोणी-बावची- सलगर हा महामार्ग असून या रस्त्यावर बावची येथे ओढ्यावर पुलाची आवश्यकता होती मोठ्या पावसात या रस्त्यावर पाणी येत होते त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता त्यामुळे याठिकाणी पूल गरजेचा आहे तरी या ओढ्यावर पूल करा अशी मागणी बावची येथील अशपाक पटेल व ग्रामस्थांनी केली होती त्यानुसार मागणी केल्याने सरकारने तात्काळ या पुलाला निधी दिला असून येथील दळणवळणाच्या मार्ग सुकर होणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.
आ समाधान आवताडे यांनी गावभेट दौरा सुरू असताना तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या त्यानुसार आम्ही सर्व्ह करून अंदाजित आकडेवारी कळविली होती त्यानुसार मंजुरी मिळाली असून हिवाळी अधिवेशनात बुकलेट वर काम येईल त्यानंतर टेंडर प्रक्रिया केली जाईल.
ए. एन. मूलगीर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम मंगळवेढा
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.