ग्रामीण विकास केंद्र, जामखेड व निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांना यंदाचा गंगाई – बाबाजी आदर्श सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भगवान महाविद्यालय, आष्टी येथे प्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गंगाई – बाबाजी महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. आष्टी, पाटोदा, शिरूरचे माजी आमदर शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गंगाई बाबाजी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी आ. भिमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले जातात. गंगाई बाबाजी महोत्सवाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.
ॲड. डॉ. अरुण हौसराव जाधव हे मूळचे आष्टी तालुक्यातील हनदगाव येथील रहिवासी असून ते भटक्या विमुक्त प्रवर्गातील कोल्हाटी समाजातील कलावंतांचे पुत्र आहेत. त्यांनी आदिवासी, भटके विमुक्त, दलीत, समाजातील गोर गरिबांच्या अनाथ, निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली असून तेथे सध्या ७० मुले व मुली निवासी शिक्षण घेत आहेत. त्याच बरोबर विधवा, परित्यक्ता, अनाथ, निराधार, महिलांसाठी त्यांनी जामखेड, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. जामखेड पासून ७ किमी अंतरावरील मोहा फाटा येथील समता भूमीवर त्यांनी अनाथ मुलांसाठी निवारा बालगृह हा प्रकल्प उभारला असून त्याच ठिकाणी महिला व मुलांसाठी ‘माय लेकरू’ हा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्हीही प्रकल्प समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणारी आर्थिक व वस्तू स्वरूपातील देणगीतून साकारत आहेत.
निवारा बालगृहात अनाथ, निराधार, वंचित, लोक कलावंत, ऊसतोडणी कामगार, विट भट्टी वरील कामगार तसेच विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना सकाळचा नाश्ता, २ वेळचे जेवण, निवासाची व्यवस्था, गणवेश, शालेय साहित्य, स्कूल बॅग, चप्पल , बूट असे सर्व साहित्य मोफत दिले जाते. येथील प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. गेल्या ७ वर्षांपासून हा प्रकल्प दानशूर व्यक्ती, कंपन्यांच्या मदतीवर सुरू आहे.
२०२०-२१ च्या कोरोना महामारीच्या संकटामध्ये ग्रामीण विकास केंद्र व कोरो मुंबई या संस्थेच्या मदतीने नगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यातील हजारो भटके विमुक्त कुटुंबांना त्यांच्या पालावर जाऊन अन्न धान्य व किराणा मालाचे वाटप केले.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मॕगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे व मानवी हक्क अभियानचे संस्थापक ॲड. एकनाथराव आव्हाड यांच्यापासून सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन फुले, शाहू, आंबेडकरी विचाराने सामाजिक चळवळीत सहभाग घेतला. मानवी हक्क आयोग, लोक अधिकार आंदोलन, दलीत अधिकार आंदोलन, लोकधारा, लोकजीवन, भटके विमुक्त आदिवासी अत्याचार निर्मूलन समिती, लोक संघर्ष समिती, वेठ बिगार मुक्ती आंदोलन, गायरान जमीन हक्क अभियान, अशा अनेक संस्था व संघटनेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून गोर गरीबांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावरील लढाई मध्ये सतत सक्रिय सहभागी आहेत. सध्या गायरान जमीन बचाव आंदोलन व मदारी समाज बांधवांसाठी मंजूर झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंमलबजावणीसाठी ते प्रशासनाशी लढा देत आहेत.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.