मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ निवडणुकीसाठी विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या तीन नेत्यांनी मंगळवारी एकत्रितरित्या बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे पंढरपुरात तुतारीची उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. आता यातील तिघांपैकी उमेदवारी लॉटरी नेमकी कोणाला लागणार की नवीन चेहरा समोर येणार, याची उत्सुकता आहे.
पंढरपूरचे माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, मोहिते पाटील समर्थक वसंत देशमुख, काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर, मंगळवेढ्याचे प्रथमेश पाटील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी या सर्व नेत्यांशी पवारांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात झाल्याची माहिती आहे.
आता शरद पवार यातील कोणाला उमेदवारी देणार की ऐनवेळी नवीन चेहरा पुढे आणणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
यावेळी खा. मोहिते-पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूपंत शिंदे, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, पंढरपूर मंगळेवढा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर कौवचाळे,, मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष रंदवे,दिपक वाडदेकर,मानिक गूंगे,दादासाहेब पवार,नाथा कशिद,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्व नेत्यांनी एकाच वेळी भेट घेतल्याने पंढरपूर मंगळवेढ्याचा उमेदवारीचा निर्णय झाला की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.
मोहिते पाटलांची भूमिका ठरणार महत्वाची
या भेटीवेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते. माढा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे एका नावावर एकमत करण्याचा मोहिते पाटील यांचा प्रयत्न असल्याचे आजच्या बैठकीतून दिसून येत आहे.
तुतारी नेमकी कोणाला मिळणार?
उमेदवारीसाठी अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे पंढरपुरात तुतारीची उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या तिघांबरोबरच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही पंढरपूर-मंगळेवढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. तसेच, वसंतराव देशमुख यांनीही तुतारीकडून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुतारी नेमकी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.