मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे अंगणातील गुप्तधन काढून देतो घरात भांडण होऊ देत नाही घराची बाधा करून करणी बाधा घालवतो.घरात भांडणे होवु देत नाही,लग्न जमत नाही ,ती बाधा काढून देतो,असे म्हणुन होम हवण करत पाठीवर जबर मारहाण करुन फिर्यादीचे मयत पतीच्या डाव्या पायाचे हाड मोडुन घरात धुप अंगारे जाळुन,पांढरी पावडर पाजुन फिर्यादी व इतर चार जणांची १३ लाख ४४ हजार ९०० रुपये एवढी रोख व फोन पे च्या माध्यामातुन रक्कम स्वीकारून फसवणुक केल्याप्रकरणी संशयित आरोपी महाराज भगवान उर्फ सुदर्शन जगनाथ स्वामी व त्याचा मुलगा विरभद्र उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी दोघे राहणार मालवंडी ता बार्शी जि. सोलापुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फिर्याद मायाक्का रेवणसिध्द मोटे वय २८ वर्षे रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा,यांनी फिर्याद दिली असून ही फसवणूकीची घटना सन जुलै २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे.
याबाबत पोलीस सत्रांनी दिलेली माहिती अशी की मालवंडी तालुका बार्शी येथील महाराज भगवान उर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी व त्यांचा मुलगा वीरभद्र उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी यांची मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर च्या फिर्यादी मायाक्का रेवनसिद्ध मोटे यांच्या पतीसोबत तालुक्यातीलच सुशीलकुमार भिकू गवळी यांनी ओळख करून दिली होती त्यानंतर संबंधित पिता पुत्र महाराजांनी फिर्यादीच्या घरी येऊन घराची बाधा करून देतो शांती करतो व त्यानंतर जमिनीखालील गुप्तधन आहे ते तुम्हाला काढून देतो तुमच्या घरात परत भांडणे होणार नाहीत याची मी बाधा करून देतो त्याकरिता तुम्हाला चार लाख रुपये पर्यंत खर्च करावा लागेल असे म्हणून त्यांनी फिर्यादीला पांढऱ्या रंगाचे भस्म पाण्यातून पिणे करता दिले त्यावेळी फिर्यादीच्या मयत झालेल्या पतीने फिर्यादीकडून घरात ठेवलेले दोन लाख रुपये त्या महाराजांच्या हातात दिले व उर्वरित दोन लाख रुपये होम हवन करतेवेळी देण्याचे ठरले तेव्हा त्यांनी फिर्यादी मार्फत शेणाच्या गोवऱ्या गोळा करून लहानसा होम केला व नारळ अंगारा लिंबू असे भगव्या कपड्यात गुंडाळून फिर्यादीच्या घराच्या प्रमुख दरवाजाच्या चौकटीवर बांधला व त्यांनी त्यांच्या जवळील सहा पुड्या अंगारा देऊन त्यातील थोडी थोडी पावडर रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पिण्यास सांगितले व ते निघून गेले त्यानंतर फिर्यादीच्या घरात सारखे भांडणे होऊ लागली त्यावेळी महाराज भगवान उर्फ सुदर्शन स्वामी व त्यांचा मुलगा वीरभद्र उर्फ उदय असे दोघेही मयत पतीला फोन करून अंगारा पिण्याबाबत व उर्वरित दोन लाख रुपये पाठवून देण्याबाबत फोन करत होते तेव्हा फिर्यादीच्या पतीने घरातील व बाहेरून असे गोळा करून दोन लाख रुपये घेऊन संजय कुमार मुकुंद शिंदे राहणार पंढरपूर यांच्यासोबत जाऊन त्यांना पोहोच केले परंतु त्यांनी फिर्यादीच्या घरातील जमिनीखाली असणारे गुप्तधन काढण्याचा होम केला नाही चार लाख रुपये देऊनही महाराजांनी फिर्यादीच्या घरी होमवन न करता पुन्हा ते अधिक पैशाची मागणी करू लागले त्यावेळेस फिर्यादीच्या पतीने वारंवार महाराज व त्यांच्या मुलाच्या फोन पे नंबर वर पाच हजार, दहा हजार, तीन हजार, सात हजार, अकरा हजार या स्वरूपात वेळोवेळी मागणी करेल त्यावेळेस पैसे पाठवून दिले दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सात वाजता महाराज वाहनातून आमचे घरी आले व त्यांनी आम्हाला त्यांच्या जवळील एक पुढीतील पांढरी पावडर पिण्याकरता दिली व तुमच्या घरात बाधा आहे ती काढल्याशिवाय गुप्तधन काढता येणार नाही असे म्हणून त्यांनी फिर्यादीचे पती रेवणसिद्ध यांना पाठीवर पायावर काठीने जबर मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी घरात होम हवन केले परंतु फिर्यादी पावडरचे पाणी पिल्यामुळे त्यांना काही समजले नव्हते व ते पुन्हा येतो म्हणून निघून गेले सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये फिर्यादीच्या पतीने मोबाईल फोन पे च्या माध्यमातून तीन लाख रुपये व रोख चार लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये महाराजांना दिले होते त्या रकमेतून महाराजांनी माढा येथून एक ट्रॅक्टर घेतल्याचे समजते परंतु त्यांनी फिर्यादीच्या घरातून गुप्तधन काढून दिले नाही उलट फिर्यादीला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर पाजली होती व पतीस पूजेच्या नावाखाली जबर मारहाण केली त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते त्यामध्ये डॉक्टरांनी रोड घालून ऑपरेशन केले होते त्यानंतर फिर्यादीचे पती महाराज भगवान यांचे विचारात मंगळवेढा येथील राजयोग्य हॉटेल समोरील रोड ओलांडताना दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी एक वाजता लक्झरी गाडीने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मयत झाले अशी फिर्याद नंदेश्वर येथील मायाक्का मोठे यांनी दिली असून संबंधित दोन्ही महाराज वरती महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समोर उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 च्या कलम ३ (२)नुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम ३२६,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत
या फिर्यादीमध्ये मंगळवेढा शहरातील सुशीलकुमार भिकू गवळी यांच्या अंगणातून गुप्तधन काढून देण्यासाठी ४ लाख ५४ हजार ९०० रुपये ,नंदेश्वर येथील मल्हारी करे यांचे लग्न जमत नाही त्याची बाधा काढण्यासाठी ६० हजार रुपये, भोसे येथील चेतन चंद्रकांत वाघमोडे यांची करणी बाधा घालवण्यासाठी १ लाख रुपये,भोसे येथील तानाजी बिरा सरगर यांचे घरातील भांडण बाधा बंद करण्यासाठी ३० हजार रुपये व फिर्यादी मायाक्का मोटे यांचेकडील ७ लाख रुपये असे मिळून १३ लाख ४४ हजार ९०० रुपये सदर महाराजांनी घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले असून तालुक्यात आणखी काही फसलेले भक्त असल्याची चर्चा आहे .