मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत ब्रम्हपुरी-मुंढेवाडी सर्व्हिस रोडला मोठा खड्डा पडला असून नागरिकांनी तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित ठेकेदाराकडून अदयापही दखल न घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान,सोलापूरचे राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता सुहास चिटणीस यांनी या घटनेची दखल घेवून तो रस्त्यावरील खड्डा तात्काळ दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी होत आहे.
मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत ब्रम्हपुरीजवळील ब्रीज खालून मुंढेवाडीकडे जाणार्या रस्त्याला मोठा मध्यभागी खड्डा गेल्या वर्षभरापासून पडलेला आहे. या खड्डयाबाबत नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे कामकाज करणार्याकडे तक्रार करूनही त्याची दखल अदयापही घेतली नसल्याने त्यांच्या कामकाजाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.ब्रम्हपुरी,मुंढेवाडी या दोन गावाला जोडणारा महामार्गालत सर्व्हिस रोड आहे. मध्यभागीच मोठा खड्डा असल्याने येथून प्राथमिक व माध्यमिक शाळेला जाणारे वाडयावस्त्यावरील विदयार्थी ये जा करतात.एखादा विदयार्थी त्यामध्ये पडून जीवीताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. हा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने दुर्घटना कधी घडेल हे नक्की सांगता येत नाही.नेहमी हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे हा खड्डा कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. मात्र राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्या ठेकेदाराच्या नजरेस का आला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता सुहास चिटणीस यांनी तात्काळ लक्ष घालून येथील तो पडलेला खड्डा दुरुस्त करून भविष्यात होणारा धोका दूर करावा अशी मागणी परिसरातील सुजाण नागरिकांतून होत आहे.
मुंढेवाडीकडे जाणार्या रस्त्याला गेले वर्षभरापासून हा खड्डा पडला आहे.अधिकार्यांचे या खड्डयाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.वाडयावस्त्यावरील आमची लहान मुले सायकलवर,पायी शाळेला येथून जातात,एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? महामार्गाची अपूर्ण कामे असताना टोळ वसुली कशीकाय केली जाते?
-ज्ञानेश्वर डोके, सेवानिवृत्त ग्रामसेवक,माचणूर.