मंगळवेढा(प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी व पुत्र आदित्य ठाकरे यांना एका आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र करावे यासाठी दबाव आणल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यातील शिवसैनिकांनी जोडमारो आंदोलन केले.
येथील चोखामेळा चौकात हे जोडोमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाउपध्यक्ष तुकाराम भोजने, तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, रामहरी जाधव,महादेव साखरे,नामदेव जाधव,अंबादास येडवे, रेवणसिद्ध बिराजदार, बिराप्पा ढाणे,संभाजी खापे,गंगाधर मसरे,विजय भरमगोंडे,बंडू चव्हाण,दत्ता कळकुंबे,विजया मुढे,क्रांती इंगोले, आदी उपस्थित होते, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी दबाव आणण्याची कबुली देत जर मी खोटे प्रतिज्ञापत्र दिले असते तर महाविकास आघाडी तीन वर्षांपूर्वीच कोसळले असल्याचा बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर इडी व इतर तपास यंत्रणाचा दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप केला. या आरोपाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली तर दिशा सायलीन आत्महत्या प्रकरणी तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना गोवण्यात यावे दिशा सायलीन हिच्यावर आदित्य यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला,आरडाओरड केली तेव्हा तिला बाल्कनीतून खाली फेकण्यात आले त्यात तिचा मृत्यू झाला असा खोटा आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर करावा असेही सांगण्यात आले. या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ मंगळवेढातील शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. या सर्व गोष्टीचा मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून अशा घाणेरड्या कृत्याचा मंगळवेढा येथील शिवसैनिकांनी निषेध केला.