श्री विठ्ठल सह.सा.कारखान्यावर औद्योगिक सुरक्षा व जागृती या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न!

पंढरपूर(प्रतिनिधी) वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करताना आपली सुरक्षा कशी बाळगावी याविषयीची सखोल माहिती देणेसाठी लोभस कन्सल्टंट, पुणे यांची कारखान्याने नेमणुक केलेली आहे.

सदर प्रशिक्षणासाठी प्रमोद सुरसे, उपसंचालक – औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सोलापूर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी साधारण सुरक्षेचे नियम, आद्योगिक सुरक्षीतता, कार्य परवाना, टूल बॉक्स टॉक, मॉकड्रीलचे महत्व, कामावर असताना अयोग्य कपड्यांचे धोके अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच इतर साखर कारखान्यामध्ये झालेल्या अपघातांचे अनुभव उदाहरणेचे दाखले सांगुन साखर कारखान्यामध्ये सदर अपघातांची पुर्नावृत्ती होवू नये या करीता उपस्थिता समवेत चर्चेच्या माध्यमातून उपाययोजना सुचविल्या.

तज्ञ प्रशिक्षक धनंजय इनामदार यांनी प्रात्यक्षिकाव्दारे वैयक्तीक सुरक्षा साधने बद्दल माहिती देवून प्रत्यक्षात कशी वापरावी, अग्निशामक उपकरणाचा वापर व खेळाच्या माध्यमातून धोका ओळखण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, सोलापूर यांनी उत्पादना बरोबरच कामगारांचे सुरक्षीततेबद्दल राबविणेत येत असलेल्या कामगार सुरक्षा उपक्रमाबद्दल कारखाना व्यवस्थापन मंडळाचे कौतुक केले.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर यु.के. तावरे, चिफ केमिस्ट बी. आर. माने, डिस्टीलरी मॅनेजर, सोळंके एन.एस., लेबर अॅण्ड वेलफेअर ऑफिसर ओ.जे. अवधुत, डे. चिफ केमिस्ट एस. बी. माळवदे, डे. चिफ इंजिनिअर के. डी. कोळेकर, कार्यालयीन अधिक्षक श्री ए. एम. कथले तसेच कारखान्याचे सर्व इंजिनिअर, केमिस्ट व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.