श्री विठ्ठल प्रशालेत पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप!

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक (1 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर व श्री विठ्ठल सह. सा. कारखाना लि. वेणुनगर व श्री विठ्ठल प्रशाला व कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन खा.रणजितसिंह नाईक- निबाळकर खासदार माढा लोकसभा मतदार संघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान मा. आ. नारायण (आबा) पाटील यांनी भूषविले सदर 01 व 02 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेचा समारोप समारंभ श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे व प्रशाला कमिटीचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी महादेव कसगावडे उपसंचालक क्रीडा व युवक संचालनालय पुणे,नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी,सत्येन जाधव तालुका क्रीडा अधिकारी, गणेश पवार राज्य अॅथलेटिक्स क्रीडा विठ्ठल सह. सा. कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमलता रोंगे,प्राचार्य बी.पी. रोगे. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, महाराष्ट्र केसरी पंछोटा मगर,पै. रावसाहेब मगर उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले प्रमुख उपस्थित होते.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निबाळकर म्हणाले की कोणत्याही खेळात प्रामाणिकपणे मेहनत केल्यास यश मिळतेच हे प्रतिकुल परिस्थितीतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविल्याचे . करतारसिंग,पै.खशाबा जाधव यांचे उदाहरण देवून सांगितले. श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील स्पर्धेच्या उद्धघाटना प्रसंगी बोलताना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे असून त्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज आहे. म्हणूनच जगाच्या स्पर्धेमध्ये तसेच ऑलांम्पिक मध्ये भारताला स्थान मिळवायचे असेल तर खेळाडूंना चांगल्या शिक्षणाबरोबर आर्थिक ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केले तर प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य विठ्ठलराव नागटिळक यांनी केले यास्पर्धेमध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर व ग्रामीण सोलापूर शहर व ग्रामीण या जिल्हयातील नामवंत 480 कुस्ती खेळाडूनी भाग घेऊन डोळयाचे पारणे फेडणान्या कुस्त्या करून कुस्तोरसिकांना मंत्रमुग्ध केले. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारीतोषक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. या पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून धनराज भुजबळ, अंकुश अरकिले, नितीन शिंदे, राजेंद्र कनसे, तानाजी केसरे, जितेंद्र कनसे यांनी उत्कृष्टपणे काम केले.

या प्रसंगी श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे सर्व संचालक, मा.संचालक बिभिषण पवार, पंढरपूर केसरी सोमनाथ सुर्वे, शेखर भोसले सपाटे सर,नागेश यादव, तुगंतगावचे संरपंच डॉ. अमृता रणदिवे अजोतीगावचे सरपंच अमरजीत पवार कारखान्याचे अधिकारी, कामगार सभासद पालक शेतकरी उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य व्ही. जी. नागटिळक याच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले. कुस्ती स्पर्धेचे समालोचन राजु देवकते व प्रमोद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. चव्हाण एस. ची तर पर्यवेक्षक नागणे एस.के यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.