मंगळवेढा(प्रतिनिधी) राजकारणी असो अथवा तरुण पिढी इथले संत विचार अंगीकारत नाहीत.म्हणून समाज दुरावत चालला आहे.एकमेकांविषयी मने त्यामुळे कुलुशीत होत चालली आहेत.रानातील तण पिकाचा नाश करते,तर मनातील तन जगण्याचा नाश करते असे प्रतिपादन बहुजन परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे -साळुंखे यांनी केले.
सावली फाउंडेशनच्या संस्थापक स्व. अनुराधा ढोबळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शाहू शिक्षण संस्था व बहुजन रयत परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनुसंध्या या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा.डाॅ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,बबनराव आवताडे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, महात्मा फुले सुतगिरणीचे अध्यक्ष अभिजित ढोबळे,अजय साळुंखे,क्रांती आवळे,चिदानंद माळी,आदींसह मान्यवर उपस्थित होते. त्या म्हणाल्या की तालुक्याच्या विकासासाठी माजी मंत्री ढोबळे यांनी दिलेले योगदान संपूर्ण तालुकावाशीयांनी पाहिले आहे.किर्तन अध्यात्म यामधून अलीकडच्या तरुणाईचे जेवढे प्रबोधन होते ते इतर कोणत्याही माध्यमातून होत नाही.मंत्रीपदामुळे राज्यभर फिरवावे लागलेल्या ढोबळे यांना घरातील सर्व व तालुक्यातील शाहू परिवार जबाबदारी स्व.अनुराधा ढोबळे यांनी मोठ्या जिद्दीने हाताळली आयुष्यामध्ये सोबत काही नेता येत नाही फक्त आपण कमावलेली माणसं आणि त्यातून मिळवलेली माणुसकीच शेवटपर्यंत टिकते या भावनेने स्व.अनुराधा ढोबळे यांनी काम केले.त्याचंच पावलावर पाऊल सावली फाउंडेशन व शाहू परिवाराच्या माध्यमातून या पुढील काळात केले जाणार आहे. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन रयत परिषद, शाहु परिवार,व सावली फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.