महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेला सोमवारपासून (दि.५) प्रारंभ होत आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून याच दिवशी सायंकाळी देवीचा कंकण मंगळसूत्र विसर्जनोत्सव कार्यक्रम होणार आहे. तर ९ डिसेंबरला यात्रेची सांगता होणार आहे.
या यात्रेसाठी जवळपास आठ लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून स्वच्छतेसह इतर पायाभूत सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुमारे एक हजार दुकाने उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे रेणुका देवीची यात्रा स्थगित करण्यात आली होती. पुरुष आणि महिलासाठी स्वतंत्र स्नानगृहाची उभारणी करण्यात आली आहे. शौचालये, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास आठ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५०० तात्पुरते शौचालये उभारण्यात आली आहेत.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.