मंगळवेढा(प्रतिनिधी) आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. ली. नंदूर या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामातील पहिल्या ११ साखर पोत्यांचे मार्गदर्शक आमदार मा. समाधानदादा आवताडे व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार आवताडे यानी आवताडे शुगर हा कारखाना ताब्यात आल्यापासून कारखाना हा प्रतेक विभागीतील अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसरात्र काम करून दोन महिन्यात हा कारखाना गळपास तयार केला व त्यास सक्षम अशी शेतकी विभागाने ही कमी कालावधीत वाहतूक यंत्रिणा उभी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भव्य दिव्य मोळीपूजनाचा कार्यक्रम घेऊ शकलो.
आज तयार झालेली ११ पोती हे कामगार व कारखाना प्रशासनाच्या अथक परिश्रमाचे फळ असल्याचे आ. आवताडे यांनी सांगीतले.
तसेेच आवताडे शुगर हा कारखाना शेतकरी हितासाठीच काम करणार असून या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यात येईल त्याचबरोबर उसाच्या वजनामध्ये कोणतीही तफावत दिसुन येणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उसाला शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देणार असल्याचेही आ आवताडे यांनी नमुद केले.
यावेळी साखर पूजन कार्यक्रमावेळी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, भाजपाचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, दामाजीचे माजी मिस्टर संचालक भारत निकम, जगन्नाथ रेवे, ब्रह्मदेव रेवे, सचिन शिंदे, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चीफ केमिस्ट मोहन पवार कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.