पंढरपूरमंगळवेढासोलापूर

शेती व पूर्व वैमनस्याचे कारण देत समाधान लोहार यांने प्राथमिक तपासात दिली कबुली!

आरोपीला दिले न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी खून प्रकरणातील संशयीत समाधान महादेव लोहार वय 33 वर्षे यास 28 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
काल दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05/30 वाचे सुमारास मोजे नंदेश्वर येथे दिपाली बाळु माळी वय 25,पारुबाई बाबाजी माळी वय 55,संगीता महादेव माळी वय 47 या तीन महिलांचा अज्ञात हत्याराने व दगडाने मारुन खुन केल्याची माहिती पोलीस पाटील संजय गरंडे देताच पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई सौरभ शेटे, परि. पोसई पुरूषोत्तम धापटे, सपोफी अविनाश पाटील, पोहेकॉ दयानंद हेंबाडे पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोना विठ्ठल विभुते, पोना विक्रम काळे, पोना बापू पवार, पोकों कैलास खटकाळे पोकों राजु आवटे हे तात्काळ घटनास्थळी हजर होवून परस्थितीची पाहणी करून आजुबाजुच्या लोकाकडे सदर खुन कोणत्या कारणासाठी, कशामुळे. कोणासोबत पुर्वीची भांडणे होती. काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला.संशयीत समाधान महादेव लोहार वय 33 वर्षे यास पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तात्काळ ताब्यात घेतले. प्रथम चौकशीत गुन्हा केला नसल्याचे सांगितले.परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली, तपासात शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातून हातातील बेडग्याने (कुदळीने ) तीन महिलाच्या डोक्यात मारुन व डोकीत दगड घालून जिवे ठार मारल्याचे सांगीतले.आरोपीवर भादवि कलम 302 असुन आरोपीस अटक केली सदर खुन करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे का याचा तपास पो.नि.रणजित माने करीत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close