ईतरराजकियराज्यसामाजिक

Vedanta Foxcon: फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल-आदित्य ठाकरेंचा आरोप

वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प पूर्णपणे वेगळे असल्याची माहिती

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली जात आहे. ही टीका होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून काही जुन्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.

फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला फॉक्सकॉन प्रकल्प आणि वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प पूर्णपणे वेगळे असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “पत्रकार परिषदेत एवढं खोटं बोलल्याचं मी कधीही ऐकलं नव्हतं किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्प २०१६ साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close