पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रशांत मोरे ,डिजिटल मीडिया च्या अध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड!

पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक, शुक्रवारी दि.6/1/23 रोजी सकाळी ११ वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात लोकमत चे वरिष्ठ पत्रकार समीर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली व मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यापन संतोष मोरे यांच्या उपस्थित संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत मोरे (दै.दिव्य मराठी) व डिजिटल मीडिया च्या अध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मोहन पाटील (दै लोकमत) सचिवपदी संदीप लिगाडे (दै.पंढरी भूषण) सहकार्याध्यक्षपदी सचिन निकम सर, प्रसिद्धी प्रमुखपदी प्रवीण पाटील, खजिनदार पोपट इंगोले (दै.माणदेश नगरी), सल्लागारपदी डॉ. समीर इनामदार (मुख्य उपसंपादक दै.लोकमत) दत्तात्रय नवत्रे (पुण्य नगरी) यांची तर सदस्यपदी सचिन इंगळे (दै.पुढारी), हुकुम मुलाणी (दै.सकाळ), गुरुदेव स्वामी(दै.सकाळ ) अहमद शेख (दै.पुण्य नगरी), बिराप्पा करे (दै सकाळ) सचिन तटाळे (दै पुढारी) इम्तिहाज काझी (दै.मंगुड शिवार), रेखा तांबट (दिव्य संचार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कायदे सल्लागारपदी अ‍ॅड. संतोष माने व अ‍ॅड.शिरीष पवार यांची निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत मोरे व सर्व नुतन पदाधिकारी व सदस्य यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close