
मंगळवेढा(प्रतिनिधी) विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त यंदाचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलचा महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मंगळवेढा येथील बहुजन परिषदेचे प्रकाश खंदारे यांना नुकताच पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी. पी. रोंगे, महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे, संस्थाध्यक्ष नगरसेवक डी. राज सर्वगौड, समितीचे अध्यक्ष भाई नितीन काळे, विलास जगधने, अनिल ननवरे यांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकाश खंदारे यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या बहुजन रयत परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात विविध कार्यक्रम घेत समाजकार्य केले आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे,शाहु परिवारच्या संचालिका अॕड.कोमलताई सांळुखे-ढोबळे यांनी अभिनंदन केले.