पंढरपूरमंगळवेढाराज्यसोलापूर

भाजप युवा मोर्चा मंगळवेढा शहराध्यक्ष पदी सुशांत हजारे यांची निवड

मंगळवेढा (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा शहर मंडल अध्यक्ष पदी सुशांत हजारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सदरील निवड जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे घोषित केली.

सुशांत हजारे यांनी यापूर्वी युवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. पक्षाचे विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच आंदोलन यामध्ये त्यांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा या पदावर संधी देण्यात आली आहे. भाजप ने मंगळवेढा शहर हे नव्याने संघटनात्मक मंडल दर्जाचे केले आहे. यामुळे येत्या काळात मंगळवेढा शहराला संघटनात्मक ताकत मिळाली आहे. मंगळवेढा नगरपरिषद बाबत विविध आंदोलने करत आवाज उठवत सुशांत हजारे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केले आहेत.

या निवडीबद्दल आमदार समाधान आवताडे, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष सूदर्शन यादव आदी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close