पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढण्याचे बळ दिले-वाडदेकर

मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्याच्या राजकारणात प्रस्थापिताच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढण्याचे बळ ढोबळे सरांनी दिल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात पहिल्या फळीतील कार्यकर्ते निर्माण झाल्याचे प्रतिपादन दामाजीची संचालक औदुंबर वाडदेकर यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त मारुतीच्या पटागणांत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे,बहुजन रयत परिषदेचे रमेश गालफाडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,भुजंगराव पाटील माजी नगराध्यक्ष अरूण किल्लेदार,नितीन काळे,पंढरपूरचे नगरसेवक डी.राज सर्वगौड,डॉ.शरद शिर्के,डॉ.प्रिती शिर्के, दामाजीचे संचालक भारत बेदरे,मुझ्झफर काझी,महादेव जाधव,अजय साळुंखे,हजरत काझी, विशाल खंदारे यांच्यासह सर्व शाळा महाविद्यालयेचे प्रार्चाय,मुख्याध्यापक शिक्षक इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                  यावेळी बोलताना संचालक वाडदेकर म्हणाले की, तालुक्याच्या राजकारणात तालुक्याच्या शेतीकारणाला बळकटी देण्याचे काम करताना 112 किलोमीटरवर संपलेला उजनी कालवा वाढवण्यासाठी ढोबळे सरांनी आपली आमदारकी पणाला लावत तो कालवा 132 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचे काम केल्यामुळे तालुक्यामध्ये उजनीच्या लाभक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद देण्याचे काम केल्यामुळे आमचे सारखे कार्यकर्ते निर्माण होऊन आज तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली. तालुक्याच्या सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांसमोर पहिल्या फळीत वावरणारे कार्यकर्ते हे ढोबळे यांच्या तालमीत तयार झाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित वास इस दास या प्रबोधनात्मक नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले याशिवाय नामवंत कवीचे कवी संमेलन घेण्यात आले दिवसभर मंगळवेढा शहरांमध्ये वीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांना मदत केलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला याशिवाय वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान वृक्षरोपण व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close