मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात 15 नोव्हेंबर अखेर गळीतास आलेल्या ऊसाची उचल 2300 प्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले असुन, गळीतास आलेल्या ऊसाच्या शेवटच्या टनेजपर्यंतचे ऊस बिल वेळेत देणार असल्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगीतले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी-सभासदांचा दामाजी कारखान्यावर विश्वास असल्यानेच चालू हंगामात 1 लाख 44 हजार 465 टनाचे गाळप करुन 1 लाख 35 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले.9.57 % सरासरी साखर उतारा असुन जिल्हयामध्ये दुस-या क्रमांकावर असून संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ सभासद-ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांच्या सहकाय्राने निश्चीतच पूर्ण करणार असल्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले. सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर कारखान्याचे खातेप्रमुख विभागाप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. ब्रम्हपूरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगांव, मल्लेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदूर, अरळी, बालाजीनगर, डोणज, पाटखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी, गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर, खडकी, भोसे, हुन्नूर, महमदाबाद हू, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रडडे, सिध्द्नकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, सिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगांव, देगांव, आंधळगांव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु, तसेच पंढरपुर, जत, मोहोळ, द सोलापुर, उ सोलापुर, कर्नाटक गेटकेन ऊसाची ॲडव्हान्स बिले धनश्री पतसंस्थेच्या विविध शाखांमध्ये, बठाण, उचेठाण, मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगांव, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, कचरेवाडी, लक्ष्मी दहिवडी, अकोला, शेलेवाडी येथील शेतक-यांची ॲडव्हान्स बिले जिजामाता महिला नागरी बि शे पतसंस्था मंगळवेढा येथे तर सांगोला गेटकेनमधून गळीतास आलेल्या ऊसाची ॲडव्हान्स बिले रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा येथे वर्ग केल्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनिल दळवी यांनी सांगीतले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.