मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्याच्या वीज प्रश्नावर आठ दिवसात तोडगा काढावा त्यावर थातूर मातूर उत्तरे न देता योग्य तो साक्षमोक्ष लावावा अन्यथा पुन्हा पंधरा दिवसात बैठक घेवू असा इशारा आ.समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आ. समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या तात्काळ सोडवण्यात याव्यात यामध्ये शेतकरी व वीज ग्राहकाचे आर्थिक पिळवणूक होऊ नये. मी कुणाच्या एक रुपयाच्या देखील मिंध्यात नाही जर असलो तर त्या दिवशी राजकारण सोडेन असा इशारा त्यांनी दिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी कशा कमी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय व लूट होणार नाही याची काळजी देखील घेण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिले. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर म्हणाले की शंभर ते तीनशे मीटर च्या कनेक्शन धारकाची यादी ठेकेदाराकडे देण्या अगोदर त्या त्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी. मंजूर लाभार्थ्यांना मोबाईलवर मेसेज यावेत. आसबेवाडी येथील शेतकऱ्यांनी कमी कनेक्शनधारकाला जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातात व जास्त कनेक्शन धारकाला कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जात असलेली तक्रार केले. नंदुर येथील परमेश्वर येणपे यांनी 33 के.व्ही सब स्टेशनचे काम रखडले आहे ते तात्काळ पूर्ण करावे.बठाण येथील बिभीषण बेदरे यांनी मीटर दिले असताना अवातस्व वीज देण्यात येत असल्याचे सांगितले, भाळवणी येथील महादेव साखरे यांनी महावितरणचे कर्मचारीच विजेचे तारा काढून विकत असल्याच्या तक्रारी केली, तर वसंत गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे मंजूर पोलपैकी तीनच पोल उभा केल्यात बाकीचे पोल उभा केले नाहीत त्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली. भोसे येथील अशोक भगरे यांनी महावितरण च्या चुकीमुळे बेदाणा शेडचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई अद्याप दिली नसल्यामुळे मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला.डोणज येथील अशोक केदार यांनी मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मर चे काम करीत नसल्याची तक्रार केली. हुन्नूर येथील 33 सब स्टेशनला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार शिवाजी कोरे यांनी केली एकूणच आज महावितरणच्या कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी आ. समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहातील वाढती गर्दी लक्षात घेता आ.आवताडे यांना विश्रामगृहाच्या बाहेर बैठक घ्यावी लागली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता शेळके,कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील,कार्यकारी अभियंता बी.ए. भोळे,उपकार्यकारी अभियंता बी.डी. चोरमुले,भाजपाचे संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण,नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर,अॕड.अमरजीत पाटील,सोमनाथ अवताडे,भाजपा ओ.बि.सी चे जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे,सुरेश भाकरे,राजन पाटील,अॕड.बापुसाहेब मेटकरी,सुदर्शन यादव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.