महाराष्ट्रसामाजिकसोलापूर
मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब यांचा सोलापूर दौरा !
सोलापूर(प्रतिनिधी) मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब हे दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मी वडार महाराष्ट्राचा चे प्रदेश उपाध्यक्ष शंकर आण्णा चौगुले यांनी दिली. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सोलापूर येथील आपले आराध्य दैवत बजरंग बल्ली या 51 फुट्टी स्मारकांचे पाहणी हनुमान गड येथे करणार आहेत. या 51 फुट्टी बजरंग बल्ली या स्मारकांचे उद्घाटन करण्यासंदर्भात चर्चा व पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केले आहे. तरी महाराष्ट्रातील मी वडार महाराष्ट्राचा चे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच संपर्क प्रमुख यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील हॉटेल किरयाड जुना पूना नाका येथे सर्वांनी उपस्थित राहण्याचे अवाहन शंक चौगुले यांने केले आहे.