पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरीतील समाजसेवक मुजमील कमलीवाले यांना राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील ब्लू स्टार सामाजिक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला असून, या पुरस्काराने कमलीवाले यांच्या समाजकार्यास पुन्हा उजाळा मिळाला आहे.
अनाथ, दिनदलित आणि दुबळ्या समाज बांधवांप्रती कायमच आस्था बाळगणारे, मुजमील कमलीवाले हे एक वेगळेच व्यक्तिमत्व पंढरपूरमध्ये नावारूपास आले आहे.
कोरोना काळात त्यांनी केलेले समाजकार्य, अनेक संस्थांनी वाखाणले आहे. यामुळेच येथील ब्लू स्टार सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मानाचा फेटा शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप असणारा हा पुरस्कार, कमलीवाले यांना पंढरीतील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हॉटेल विठ्ठल इनमध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक महादेव धोत्रे आणि ब्लू स्टार सामाजिक संस्थेचे सचिव चंदन बनसोडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. स्वतःच्या सामाजिक कार्याची झलक पंढरपूरवाशीयांना दाखवत, मुजमील कमलीवाले यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. छोट्या छोट्या पुरस्कारापासून, अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. जसेजसे पुरस्कार मिळत गेले, तसतशी अधिकची सामाजिक ओढ त्यांच्यामध्ये निर्माण झाली. साहजिकच त्यांचे समाजकार्य आणखी बहरत चालले आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.