मंगळवेढा(प्रतिनिधी)अवकाळी वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतातील पिके,घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे केली. दोन दिवसात तालुक्यामध्ये अवकाळी वादळाचा तडाका बसला आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी दक्षिण भागातील सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, लवंगी या गावाला तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, महमदाबाद शे,मारापुर, या भागात त्या वादळाचा तडका बसला तर आज खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वादळामुळे शेतातील आंबा, द्राक्षे,डाळिंब या पिकाचे तर लक्ष्मी दहिवडी येथे लोकांचे राहत्या घराचे व जनावराच्या शेडचे देखील पत्रे उडून गेले आहेत. गुंजेगाव येथे विजेचा ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाला. मारापुर येथे आंबा पिकाचे व एका शेतकऱ्याच्या झाड घरावर पडले आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जनजीवन कोलमडले आहे या वादळामुळे शेतकरी आणखीन दास्तवला आहे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानी करताना महसूल विभागाने फक्त आंधळगाव आणि भोसे हे दोन महसूल मंडळ घेतले होते त्या मंडळ मधील देखील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्याची पुनरावर्ती न करता महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी सिद्धेश्वर अवताडे यांनी केली याशिवाय नुकसानग्रस्त काही कुटुंबाला स्वखर्चाने आर्थिक मदत देऊ केली.
Related Articles
Check Also
Close