श्री संत दामाजी कारखान्याची सभासदांना सवलतीच्या दराची साखर दर शुक्रवारी वाटप होणार- चेअरमन शिवानंद पाटील
मंगळवेढा(प्रतिनिधी)श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर दिपावली सण २०२२ करिता तालुक्यातील सभासदांचे सोईनुसार २५ ठिकाणी केंद्रनिहाय वाटप केलेली आहे. अद्यापही कांही सभासदांनी साखर उचललेली नाही अशा राहिलेल्या सभासदांची साखर यापुढे दर शुक्रवारी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत कारखाना साईटवरील सभासद साखर विक्री केंद्रातून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी ज्या सभासदांची साखर राहिलेली आहे त्यांनी घेवून जावे असे आवाहन चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांनी केले आहे. सभासदांच्या सोयीचे दृष्टीने सदरची साखर दि २५ नोव्हेंबर पासून प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहे तरी सभासदांनी राहिलेली साखर ३१ डिसेंबरपूर्वी घेवून जाण्याचे आवाहनही त्यांनी सदर प्रसंगी बोलताना व्यक्त केले
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर,भारत बेदरे,बसवराज पाटील,राजेंद्र चरणु पाटील,रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, दयानंद सोनगे, दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,सुरेश कोळेकर, तानाजी कांबळे यांचेसह कार्यकारी संचालक सुनिल दळवी व सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते